अकोला : पश्चिम विदर्भात शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची चिन्हे आहेत. अकोला जिल्ह्यातील उद्धव ठाकरे शिवसेनेचा मोठा गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करून ते एकनाथ शिंदेंच्या गोटात दाखल होण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराज नेते एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हेही वाचा – अमृत भारत स्थानक! आज पायाभरणी प्रसंगी होणार जल्लोष
शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करून वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. आता शिवसेना पक्ष, चिन्ह व मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंकडे आहे. त्यामुळे नेत्यांचा ओढा त्यांच्याकडे वाढला आहे. अकोला जिल्ह्यातून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची एकनाथ शिंदे यांना साथ मिळाली. आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील आणखी एक मोठा गट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहे. त्यामध्ये आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह जुन्या शिवसैनिकांचा समावेश आहे. एकनाथ शिंदेंसोबत त्यांची प्राथमिक स्तरावरील बोलणी झाली असून लवकरच त्यांचा पक्षप्रवेश घडून येणार असल्याचे कळते. तो प्रवेश सोहळा मुंबईत घ्यावा की अकोल्यात यावरून खल सुरू असल्याची माहिती आहे.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असलेला गट पक्षात नाराज आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात शिवसेना रुजविण्याचे कार्य केले. शिवसैनिकांचे जाळे निर्माण केले. मात्र, आता इतर पक्षांमधून काही वर्षांपूर्वी आलेल्यांना अधिक महत्त्व दिल्या जाते. जुन्या, जाणत्या शिवसैनिकांना बाजूला केले जात आहे, अशी खंत एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केली. एकनाथ शिंदे आमचे जुने सहकारी आहेत. मूळ शिवसेना आता त्यांच्याकडे आहे. एकनाथ शिंदेंसोबत जाण्याचा शिवसैनिकांमधूनच दबाव वाढत असल्याचे त्यांनी सांगून शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
अकोला जिल्ह्यासह अमरावती, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातीलही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही जण शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.
संभाजीनगरमध्ये बैठक?
शिवसेना शिंदे गटाने आता संघटनात्मक बळकटीकरणावर जोर दिला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नाराजांवर शिंदे गटाचे लक्ष आहे. मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे हे अकोला जिल्ह्याच्या ठाकरे गटातील नाराज नेत्यांसोबत संभाजीनगर येथे एक बैठक घेणार असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.