भंडारा : विवाहबाह्य असलेल्या प्रेमसंबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काटा काढल्याचा धक्कादायक प्रकार अड्याळ पोलीस ठाण्याअंतर्गत घडला. प्रियकरासोबत पतीच्या हत्येचा कट रचून गळा आवळून त्याचा खून केला. एवढेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्यासाठी तिने पतीचा मृतदेह माडगी वनसंकुलातील नाल्यात फेकून दिला. मात्र, बुधवार १३ डिसेंबर रोजी पहाटे पतीचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला आणि पत्नीचे बिंग फुटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पत्नी ज्योती आदेश राऊत, वय ३५ आणि तिचा प्रियकर विकी नथू करकाळे, वय ३६, रा. आंबेडकर वॉर्ड पवनी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये विकीला अटक करण्यात आली आहे. आदेश मदन राऊत (वय ३८, रा. गणेश वॉर्ड, साकोली) असे मृताचे नाव आहे.

हेही वाचा – इंडियन ऑईलमध्ये दीड हजाराहून अधिक पदांसाठी भरती; सविस्तर माहितीसाठी…

आदेश राऊतची पत्नी ज्योती हिचे विकी करकाळेसोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. पती आदेशला त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल माहिती होताच त्याने दोघांच्या प्रेमाला विरोध केला. पती प्रेमात अडसर ठरत असल्याने पत्नीने प्रियकरासोबत मिळून त्याला संपविण्याचा कट रचला. संधी मिळताच दोघांनी मिळून गळा दाबून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी अड्याळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माडगी जंगलातील नाल्यात मृतदेह फेकून दिले. मंगळवारी रात्रीच्या सुमारास दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावली असावी, असा संशय आहे. घटनेची माहिती मिळताच अड्याळचे पोलीस निरीक्षक प्रशांत मिसाळे, पोलीस उपनिरीक्षक गोडमले व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा – गडचिरोली : पोलीस-नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार, मृतांमध्ये जांभूळखेडा स्फोटातील सूत्रधार

आदेश राऊत याची आई सारिका मदन राऊत यांच्या तक्रारीवरून आणि दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तपासाला दिशा दिली. पत्नी ज्योती राऊत आणि विकी करकाळे या दोघांना पोलिसांनी अवघ्या काही तासांतच शोधून काढले. दोघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता आदेशचा गळा आवळून खून केल्याचे दोघांनीही कबूल केले. ज्योती राऊत आणि विकी करकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.