भंडारा : तालुक्यातील शहापूर येथील हॉटेल व्यावसायिक शशिकांत राजूरकर यांच्या घरासमोर दोन अज्ञात बंदूकधारी तरुणांकडून बंदुकीचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज दि. २० जुलै रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. हवेत बंदूक दाखवून दहशत माजविण्याचा प्रकारही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शशिकांत राजूरकर यांची ओळख जिल्ह्यात व परिसरात गोल्डन मॅन अशी आहे. घटनेच्या दिवशी राजूरकर यांच्या बँक ऑफ इंडिया शाखेजवळील दुमजली घराखालील दोघे तरुण दुचाकीने आले होते. त्यांच्या हाती बंदूक आणि चाकूसारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्रधारी तरुणांनी प्रथम राजूरकर यांच्या घराखालील एका दुकानाच्या शटरचे कुलूप तसेच अन्य एका हार्डवेअरच्या दुकानाचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर
राजूरकर यांच्या घरासमोर बंदुकीचा धाक दाखविण्याचा प्रयत्न करण्यात करण्यात आला. दुचाकीवर मागे बसलेल्या तरुणाने हवेत बंदूक फिरवून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा – वाशीम : पंचायत समितीच्या सभापती कक्षाचे छत कोसळले, इमारत जीर्ण, कर्मचारी भीतीच्या सावटाखाली

हेही वाचा – १० हजारांची लाच स्वीकारतांना सरपंच अडकला

जवाहरनगर पोलीस स्टेशनचे थानेदार सुधीर बोरकुटे पोलिसांसह घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पुढील तपास करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A shocking incident took place in front of shashikant rajurkar house where two unknown gunmen attempted to show the threat of a gun ksn 82 ssb