नागपूर जिल्ह्यातील दगडपारवा येथे एका अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. दत्तात्रय गोपाल मुळे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा- अमरावती : नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी संयुक्त अभियान राबवा; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे निर्देश
बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथील शेतकरी दत्तात्रय मुळे यांच्याकडे दोन एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे ते त्रस्त होते. त्यांच्यावर बँकेचे कर्ज देखील होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे? या विवंचनेत असलेल्या दत्तात्रय मुळे यांनी टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या राहत्या घरी विष प्रशान केले. याची माहिती कुटुंबांना मिळताच त्यांनी तत्काळ उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्याची धडपड केली. मात्र, वाटेतच त्यांची प्राणज्योती मालवली. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा असा आप्तपरिवार आहे. सर्वोपचार रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. बार्शीटाकळी पोलीस पुढीत तपास करीत आहेत.