नागपूर : मध्यरात्रीच्या सुमारास आईसह झोपलेल्या चिमुकलीच्या अंगावर घराच्या आड्यावरून जात असलेला साप पडला. सापाने चिमुकलीच्या करंगळीला चावा घेतल्यामुळे चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. सिद्धांती संदीप धोंगळे (४) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धांतीचे आई-वडिलांमध्ये कौटुंबिक वाद असल्यामुळे दोघेही विभक्त राहतात. सिद्धांती ही आई आणि आजी-आजोबांसह गिट्टीखदानमधील दाभा-साईनगरात राहतात. सोमवारी सर्व जण जेवण करून झोपी गेले होते. सिद्धांती आईसह झोपली असताना मध्यरात्रीच्या सुमारास घराच्या छताच्या आड्यावरून विषारी नाग पडला. सापाने सिद्धांतीच्या उजव्या हाताच्या करंगळीला चावा घेतला आणि निघून गेला. साप चावल्यामुळे चिमुकली झोपेतून खडबडून  जागी झाली. त्यामुळे आईला जाग आली. त्यांना विषारी साप घराबाहेर जाताना दिसला. प्रकार लक्षात आल्यामुळे लगेच चिमुकलीला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A snake fell on a sleeping child snake bite child died adk 83 ysh