नागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त देशाच्या विविध राज्यातून अनुयायी दीक्षाभूमीवर येतात. लाखो लोकांच्या गर्दीमुळे अनेक लोक हरवतात. या लोकांना मदत करण्यासाठी ‘सहयोग’ संस्थेचे विशेष पथक दीक्षाभूमीवर कार्यरत राहणार आहे. लहान मुले आणि वृद्ध नागरिकांच्या मदतीसाठी ‘सहयोग’चे पथक विशेषत: कार्य करते. १९८९ सालापासून ‘सहयोग’ संस्थेचे लोक दीक्षाभूमीवर सेवा देत आहेत. सहयोग संस्थेच्या कार्याची व्याप्ती बघता दीक्षाभूमीवर तैनात पोलिसही हरविलेल्या लोकांना त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  संस्थेची मदत घेतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

 आजवर सहयोग संस्थेच्यावतीने हजारो नागरिकांना सुखरुपपणे त्यांच्या नातेवाईकांपर्यत पोहोचविण्याचे कार्य सहयोग च्यावतीने करण्यात आले आहे. सहयोगचे पदाधिकारी हरविलेल्या लोकांना स्वयंखर्चाने त्यांच्या मूळगावी पोहोचवतात. याशिवाय दीक्षाभूमीवर आलेल्या अनुयायांना रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती देणे, त्यांची आरोग्य तपासणी करणे आदी कार्यही सहयोगमार्फत केले जातात. यंदाही सहयोग संस्थेचे स्वयंसेवक दीक्षाभूमीवर जागोजागी तैनात करण्यात आले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A special team of sahayog sanstha is working at diksha bhoomi to help people on the occasion of dhammachakra pravartan day tpd 96 amy