अकोला: नीट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचे धडे देण्यासाठी विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासंदर्भात संपूर्ण प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे. कार्यशाळेत उपस्थित राहण्याचे आवाहन माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील वाशीम मार्गावरील प्रभात किड्स स्कूल येथे २ जुलैला सकाळी ११ वाजता आयोजित कार्यशाळेत वैद्यकीय शिक्षण संचालनालयाचे माजी संचालक डॉ. प्रवीण शिनगारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नीट ही वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची परीक्षा असून या माध्यमातून एमबीबीएस, बीडीएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, फार्मसी आदी अनेक शाखेत वैद्यकीय प्रवेश होतात. प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय संचालनालयातून पार पाडली जाते. त्यामुळे प्रवेश प्रक्रिया विद्यार्थी व पालकांनी समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हेही वाचा… ‘MBA’ची प्रवेश प्रक्रिया सुरू; अर्जासाठी ‘ही’ आहे शेवटची मुदत

देशभरात एकच परीक्षा असतांना योग्य मार्गदर्शना अभावी समान गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रवेश मिळतो. सारखेच गुण असताना योग्य तो निवड क्रमांक न दिल्याने एकाला शासकीय तर दुसऱ्याला खासगी महाविद्यालय किंवा व्यवस्थापन कोट्यात सुद्धा प्रवेश घ्यावा लागतो. योग्य महाविद्यालय निवडता आले तर हा नंतरचा मनस्ताप टाळता येणे शक्य असते. याच मुद्द्याला धरून अकोला, बुलढाणा व वाशीम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय प्रवेश पूर्व मार्गदर्शनपर कार्यशाळा गत अनेक वर्षांपासून सातत्याने आयोजित केली जात आहे. यंदा देखील ही कार्यशाळा रविवारी होणार असून मार्गदर्शनासह शंकांचे निराकरण करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A special workshop has been organized to teach the medical admission process to the neet qualified students in akola ppd 88 dvr
Show comments