अकोला : आषाढी एकादशीचा महोत्सव महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव असून या माध्यमातून सामाजिक एकोपा वृद्धिंगत होत असतो. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीची ओळख होण्याच्या दृष्टीने प्रभात किड्स स्कूलमध्ये आषाढी एकादशी सोहळा बुधवारी चांगलाच रंगला. या बहारदार कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कीर्तन, अभंग, नृत्य, पावली यासह महाराष्ट्रातील लोकसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन घडवले.

कार्यक्रमाला प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, व्यवस्थापक अभिजीत जोशी, पर्यवेक्षक मो. असिफ, प्रा. डॉ. सुहास उगले, अ‍ॅड. वल्लभ नारे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. महोत्सवात विद्यार्थ्यांनी विठ्ठल माऊलीचे गीत सादर केले. तसेच अभंग गायन व भावार्थदेखील सादर केले. तत्पूर्वी मराठी विभागाचे शिक्षक आनंद जोशी, कविता कोल्हाळे यांनीदेखील अभंग सादर केले. नृत्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या नृत्य आणि पावलीतून संपूर्ण वारीचे दर्शन घडवत कार्यक्रमात रंगत आणली. इयत्ता दहावीतील अनुजा माळी हिने कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विभावरी नेमाडे, कार्तिकी सरप, श्रावणी महल्ले आणि शाल्मली वानखडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर गौरी हिवरकर हिने आभार मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. ‘प्रभात’चे सांस्कृतिक विभाग प्रमुख नंदकिशोर डंबाळे व मराठी विभाग प्रमुख चंद्रकांत पोरे यांच्या समन्वयात सादर झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन प्रभातच्या मराठी भाषा विभागाद्वारे करण्यात आले होते.

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Special train from Konkan route , Konkan train ,
कोकण मार्गावरून विशेष रेल्वेगाडी
Yatra of Yallama Devi begins in Jat
यल्लमा देवीच्या यात्रेस जतमध्ये प्रारंभ
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Tourists unaware of public holiday rules crowd in front of Veermata Jijabai Bhosale Park
सार्वजनिक सुट्टीच्या नियमाबाबत अनभिज्ञ पर्यटकांची राणीच्या बागेसमोर गर्दी
Shegaon Gajanan Maharaj temple , Shegaon,
अवघी दुमदुमली संतनगरी! विदर्भ पंढरीत पाऊण लाख भाविकांची मंदियाळी…
agricultural pumps powered
राज्यात १.३० लाखांवर कृषिपंपांना दिवसा ‘ऊर्जा’, सौर ऊर्जेद्वारे…

हेही वाचा – नागपूर : विठू नामाच्या गजराने विदर्भातील पंढरी दुमदुमली, धापेवाड्यात अलोट गर्दी

इंग्रजी कीर्तन ठरले प्रमुख आकर्षण

कीर्तन आध्यात्मिक जागरासोबत सामाजिक परिवर्तनाचेदेखील माध्यम राहिले आहे. प्रभातच्या इयत्ता नववीतील देहुती बगले हिने इंग्रजी भाषेत कीर्तन सादर केले. भाषा सांस्कृतिक अडसर नसून खऱ्या अर्थाने संवादाचे माध्यम असल्याचे या कीर्तनातून अधोरेखित झाले. यावेळी आर्या ढोले व पूर्वा बळी यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजूषा घेऊन सांस्कृतिक ज्ञानाची उजळणी करून घेतली.

Story img Loader