चंद्रपूर : राजुरा शहरालगत असलेल्या धोपटाला पेट्रोल पंप जवळ रात्री रविवारी ८ वाजता राजुराकडून सास्तिकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मोटारसायकलने आपल्या पत्नी व मुलीला घेऊन येणाऱ्या निलेश वैद्य (३२ वर्ष) रुपाली वैद्य (२६ वर्ष), मधू वैद्य (३ वर्ष) यांचा जोरदार धडक दिली. या अपघातात एकाच परिवारातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर याच ट्रकने समोर जाऊन प्रज्ञा प्रशाद टगराफ (३३) व प्रसाद राजाबाई टगराफ (४० ) दोन्ही रामपुर येथील यांना धडक दिल्याने दोघेही जखमी आहे.
जखमींना चंद्रपूर येथे उपचाराकरिता पाठविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी पाहण्याकरिता गर्दी केली होती. सदर माहिती राजुरा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून गर्दी नियंत्रणात आणली. प्राप्त माहितीनुसार धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे वास्तव्याने असलेला निलेश वैद्य हा मजुरी करून आपल्या परिवारासह राहत होता. सकाळी आपल्या पत्नी व मुलीसह बाहेरगावी कामानिमित्त गेले होते.
हेही वाचा >>> नागपूर : लग्नाआधी मधुचंद्राची रात्र साजरी केली अन्…
सायंकाळी ते काम आटपून घरी येत असताना घरापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंप जवळ राजुरा कडून सास्तीकडे जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकला धडक दिली धडक एवढी जोरदार होती की त्यात वैद्य परिवाराचा चकानाचुर झाला. तर समोर याच ट्रकने दोन मोटार सायकलस्वारांना धडक दिली यात रामपुर येथील दोघेही जखमी असून जखमींना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता प्रकृती गंभीर असल्याने चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.
हेही वाचा >>> अमरावती : पत्नीचे परपुरूषासोबत अनैतिक संबंध; झोपेचे सोंग घेऊन..
नागरिकांनी ट्रकचालक यांना पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. समोरील तपास राजुरा पोलिस करीत आहे. धोपटाळा सास्ती मार्गावर मोठ्या प्रमानात खड्डे पडले असून प्रशासन याकडे दुर्लक्ष देत असल्याने कित्येक वाहनधारक या मार्गावर दररोज किरकोळ जखमी होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.