नागपूर : भरधाव ट्रकने ट्रिपल सीट जाणाऱ्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह दुचाकीचालक युवक ठार झाला. हा अपघात बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता कोंढाळीजवळ घडला. रोशन निळकंठ सहारे (२५), सुषमा उमेश वाघाडे (२८) आणि प्रतीक्षा राजेंद्र वाघाडे (२२) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन सहारे हा दुचाकीवर प्रतीक्षा आणि सुषमा यांना घेऊन चमेली गावावरून शिवा गावाला जात होता. सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील चाकडोह गावाजवळून शिवा गावाकडे जाणाऱ्या वळणार मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली.

Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

हेही वाचा – नागपूर : बार्टी, महाज्योती, सारथीच्या स्वायत्ततेवर गदा?

या धडकेत तिघेही गंभीर जखमी झाले. तिघांना रुग्णवाहिकेतून नागपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिघांचाही मृत्यू झाला.

Story img Loader