चंद्रपूर : राजकीय महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्या धानोरकर कुटुंबात उभी फूट पडली आहे. भद्रावती-वरोरा मतदारसंघातून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ‘लाडका भाऊ’ प्रवीण काकडे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिल्याने नाराज झालेले त्यांचे भासरे अनिल धानोरकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. काकडे उमेदवार असले तरी त्यांच्या जय-पराजयाची संपूर्ण जबाबदारी खासदार प्रतिभा धानोरकर यांचीच असणार आहे. यामुळे धानोरकर कुटुंबातील सून आणि भासरे एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

गेल्या दहा वर्षांपासून भद्रावती-वरोरा मतदारसंघावर धानोरकर कुटुंबाचे अधिराज्य आहे. २०१४ मध्ये बाळू धानोरकर निवडणूक जिंकून विधानसभेत पोहचले. त्यावेळी त्यांचे बंधू अनिल धनोरकर भद्रावतीनगर परिषदेचे नगराध्यक्ष होते. २०१९ मध्ये शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून बाळू धानोरकर काँग्रेसमध्ये दाखल झाले. तसेच लोकसभेची निवडणूक लढवली आणि महाराष्ट्रात त्यांच्या रुपाने काँग्रेसचा एमकेव खासदार निवडून आला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत खासदार धानोरकर यांनी पत्नी प्रतिभा यांच्यासाठी उमेदवारी खेचून आणली व त्यांना आमदार केले. बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकून प्रतिभा धानोरकर खासदार झाल्यात. आता त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरत बंधू प्रवीण काकडे यांच्यासाठी उमेदवारी आणली. यामुळे त्यांचे भासरे अनिल धानोरकर नाराज झाले आहेत.

Palghar MLA Shrinivas Vanga return
Shrinivas Vanga: ‘आधी रडले, ठाकरेंना देव म्हणाले’, घरी परतल्यावर आमदार श्रीनिवास वनगांचे सूर बदलले; म्हणाले, “एकनाथ शिंदे…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Ravi Raja Joins Bjp and Left Congress
Ravi Raja : मुंबईत काँग्रेसला धक्का! रवी राजा यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Mahavikas Aghadi final Seat Sharing Formula
Maharashtra Assembly Election 2024 : महायुती व महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला! सहा पक्षांकडून इतके उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Devendra Fadnavis on Rebelian
Devendra Fadnavis : “उमेदवारी दिलेली नसताना ज्यांनी अर्ज भरलाय…”, बंडखोरांसाठी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!
What Devendra Fadnavis Said About Ajit Pawar?
Devendra Fadnavis : “आर. आर. पाटील यांचं निधन झालंय, तो विषय…”; अजित पवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा – अमरावती : कर्मचाऱ्यांसाठी निवडणुकीचे काम नावडते! ड्युटी रद्द करण्‍यासाठी ८२० अर्ज

प्रत्यक्षात पक्षश्रेष्ठी अनिल धानोरकर यांनाच उमेदवारी देण्यास अनुकूल होते. मात्र, खासदार धानोरकर यांनी भासऱ्यांना कोणत्याही स्थितीत काँग्रेसची उमेदवारी मिळू द्यायची नाही, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेत. अखेर काँग्रेस नेत्यांची इच्छा असूनही शेवटच्या क्षणी अनिल धानोरकर यांच्याऐवजी काकडे यांना उमेदवारी दिली गेली. आता अनिल धानोरकर यांनी काकडे चालणार नाहीत, अशी भूमिका घेत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.

हेही वाचा – निवडणुकीत तेली समाजाचे पक्षीय प्रतिनिधित्व, काही ठिकाणी तर तेली विरुद्ध तेलीच

राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे धानोरकर कुटुंबात संघर्ष पहायला मिळत आहे. यामुळे मतदारसंघातील काँग्रेसचा पारंपरिक मतदार, पदाधिकारी व कार्यकर्तेही नाराज असल्याचे बोलले जाते. दिवं. बाळू धानोरकर यांनी पत्नी प्रतिभा धानोरकर यांना थेट आमदार बनवले, यानंतर त्या खासदार झाल्यात. आता प्रतिभा धानोरकर आपल्या भावाला आमदार बनवायला निघाल्या आहेत.

मुलाला सक्रिय राजकारणात आणण्यासाठी खटाटोप

काकडे यांना उमेदवारी देण्यामागे खासदार प्रतिभा धानोरकर यांचा दुहेरी हेतू आहे. दहा वर्षांनंतर त्यांना आपल्या मुलाला सक्रिय राजकारणात उतरवायचे आहे. यासाठी त्यांनी बंधू काकडे यांना उमेदवारी देऊन आतापासूनच पाया रचणे सुरू केले आहे. भाऊ निवडून आला किंवा नाही, तरी परिस्थिती ‘जैसे थे’च राहील. भासरे अनिल धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली तर त्यांची मुले व पत्नीदेखील मतदारसंघावर दावा करतील, ही भीती खासदार धानोरकर यांना आहे व होती. त्यामुळेच खासदार धानोरकर यांनी क्षमता नसतानाही भावाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.