नागपूर : दीक्षाभूमीवर यंदा मोठ्या प्रमाणात पुतळ्यांची दुकानेही लावण्यात आली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध, महात्मा फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. या पुतळ्यांच्या किंमती हजार रुपयांपासून ते लाख रुपयांपर्यंत आहेत. दीक्षाभूमीवर बाबासाहेबांच्या एका पुतळ्याची किंमत वीस लाख रुपये आहे.
हेही वाचा – नागपूर : जरीपटक्यातील क्रिकेट बुकीवर छापा, ‘युवराज’ला चौकशीविना सोडल्याने संशय
बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना विशेष मागणी असल्याचे एका विक्रेत्याने सांगितले. अष्टधातूपासून निर्मित या पुतळ्यांची आंबेडकरी संस्था, बौद्ध विहार समितीद्वारा मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. पुतळ्यांच्या या दुकानावर सेल्फी काढण्यासाठीही मोठ्या संख्येत अनुयायांनी गर्दी केली होती.