बुलढाणा: बुलढाण्यात आज बुधवारी सकल मराठा समाजतर्फे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या मार्गासह शहर परिसरात ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मलकापूर, चिखली, अजिंठा, धाड, खामगाव या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैनात होते. त्याशिवाय सर्व जिल्ह्यातील मोर्चेकरी एकत्रित होण्याच्या ठिकाणी जिजामाता संकुल, संगम चौक ते जयस्तंभ , बाजारपेठ मार्ग ते स्टेटबँक चौक या मार्गावर जादाचा बंदोबस्त आहे.
हेही वाचा… आमदार रोहित पवार… रोहित पाटील.. आणि नागपूरचे झणझणीत तर्री चणा पोहे; काय आहे वाचा…
पोलीस अधीक्षक सुनील कडासने हे स्वतः बंदोबस्तावर नजर ठेवून होते. याशिवाय ५ पोलीस उप अधीक्षक, २० पोलीस निरिक्षक, ४४ उप पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक, ६६२ पुरुष व १६५ महिला पोलीस तैनात करण्यात आले. त्यांच्या जोडीला ५५ वाहतूक कर्मचारी नियुक्त करण्यात आले. साध्या वेषातील ४३ खुपिया आणि १५ कॅमेरे मोर्च्यावर करडी नजर ठेवून होते. ३ दंगा काबू पैथक सज्ज ठेवण्यात आले.