बुलढाणा : भरधाव टिप्परने ऑटोला धडक दिल्याने एका विध्यार्थ्याचा मृत्यू झाला तर सहा जण जखमी झाले. जखमींना बुलढाण्यात उपचारसाठी दाखल करण्यात आले असून एका गंभीर विध्यार्थ्याला अकोला येथे हलविण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील शेंबा नजीक आज ही दुर्घटना घडली. शेंबा येथील सरस्वती ज्ञानमंदिर मधील नर्सरी केजी वन व केजी टूची शाळा सुटल्यानंतर जवळा बाजार येथील बाल विद्यार्थी ऑटोमध्ये बसून गावाकडे जात होते. दरम्यान, त्यांच्या ऑटोला भरधाव टिप्परने धडक दिली. अपघातात सात विध्यार्थी जखमी झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यांना बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. त्यातील पवन मुकुंद (४, रा. जवळा बाजार, ता. मोताळा) याचा मृत्यू झाला. सार्थक काकर (३, रा. जवळा बाजार) या अत्यावस्थ बालकाला अकोला येथे पुढील उपचाराकरिता हलवण्यात आले आहे. उर्वरित पाच जणांवर बुलढाणा येथे उपचार सुरू आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.