पवनी तालुक्यातील वलनी (चौ) येथील गांधी विद्यालयात इयत्ता १० वीला शिकत असलेला श्रेयस युवराज जिभकाटे (१६) रा. वलनी (चौ) मित्रांसोबत वैनगंगा नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला असता खोल पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी सुट्या असतात. त्यामुळे श्रेयस घरी अभ्यास करीत बसलेला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>चंद्रपूर: वाघ जुमाणेना…. गुराखी ठार, गोठ्यात शिरून बैलाचाही घेतला घास!

आई-वडील शेतावर कामासाठी गेलेले असताना त्याचे मित्र त्याला सोबत घेऊन नदीवर गेले. सुरुवातीला श्रेयस पाण्यात आंघोळ करण्यासाठी उतरला. तो पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच मदतीला एक एक करून दोन्ही मित्र धावले पण त्यांना श्रेयसला बाहेर काढण्यात यश आले नाही. आरडाओरड करून त्यांनी ११८ क्रमांकावर फोन केला व पोलीस कक्षात कळवले. काही वेळात शव शोधण्यात ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांना यश आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A student from valani in pavani taluka drowned in the river ksn 82 amy