आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर घराशेजारी राहणाऱ्या युवकाने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. ही घटना नरखेड तालुक्यातील एका गावात उघडकीस आली. अनिल सुरेश टेकाडे (३२) असे आरोपीचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल टेकाडे याला मद्याचे व्यसन आहे. त्याची वाईट नजर शेजारी राहणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर होती. तो नेहमी त्या मुलीशी छेडखानी करीत होती. ती घरी आल्यानंतर तिच्याशी अश्लील चाळे करीत होता. अनेकदा पीडितेच्या घरी कुणी नसताना तिच्याशी बळजबरी करण्याचा प्रयत्न केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> शेतकरी कर्ज वाटपात बनवाबनवी ; ३ टक्के लाभासाठी जुने कर्ज न फेडताच नवीन कर्जाचे वाटप

१ जुलै रोजी दुपारी दीड वाजता शेजारी असलेल्या एका इमारतीच्या मागे नेऊन पीडितेसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. केलेल्या कृत्याबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली.त्यानंतर तो वारंवार पीडितेवर अत्याचार करत होता. १३ सप्टेंबरला सायंकाळी अनिल टेकाडे हा त्या पीडितेवर अत्याचार करताना गावातील एका युवकाला दिसला. त्याने पीडितेच्या आईवडिलांना सांगितले. पीडितेच्या पालकांनी तक्रार दाखल केल्यानंतर नरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल करून अनिलला अटक केली.