भंडारा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संचलित स्व. अन्नाजी कुलकर्णी सार्वजनिक वाचनालयाच्या अभ्यासिकेत एका विद्यार्थ्याची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना आज शनिवारी शहरातील हेडगेवार चौकात घडली.
विद्यार्थ्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याचा मृत्यू झाला. वैमनस्यातून ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. माहिती कळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला अटक केली. मृत विद्यार्थ्याचे नाव अतुल वंजारी तर आरोपीचे नाव गंगाधर नारायण निखारे, ४० पद्मा वार्ड, पवनी असे आहे.