नीटच्या परीक्षेसाठी रामेटक तालुक्यातून नागपुरात आलेल्या विद्यार्थिनीवर तिच्या मित्रानेच बलात्कार केला. ही घटना बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत घडली.१७ वर्षांची पीडित विद्यार्थिनी आणि आरोपी उमेश राऊत (२६) दोघेही एकमेकांना ओळखतात. १७ वर्षीय पीडित मुलीची डॉक्टर होण्यासाठी तयारी सुरू होती. ७ जुलैला नीटची परीक्षा देण्यासाठी ती नागपुरात आली. ती नागपुरात येत असल्याची माहिती उमेशला मिळाली.

हेही वाचा – नागपूर : बेवारस मूकबधिर मुलगा सहा वर्षानंतर आईकडे परत ; आधार कार्डमुळे सापडला पत्ता

तिच्यापाठोपाठ उमेशही नागपुरात आला. विद्यार्थिनीचा पेपर संपल्यानंतर उमेश तिला भेटला. धमकी देत तिला मनीषनगरातील बेसा ग्रामपंचायत जवळील एका पडक्या घरात घेऊन गेला. उमेशने धमकी देत त्या मुलीवर बलात्कार केला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला.

Story img Loader