वर्धेलगत बोरगाव मेघे येथील परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्याजवळ भ्रमणध्वनी संच आढळून आल्याने खळबळ उडाली. मात्र, लगेच उत्तरपत्रिका ताब्यात घेण्यासोबतच केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकावर कारवाईचा बडगा तर केंद्रच रद्द करण्याची शिफारस झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- ‘बोर्डाचे’ एफआयआर दाखल करण्याचे आदेश; पेपर फूट प्रकरणाची गंभीर दखल

आज बारावीचा गणिताचा पेपर असल्याने शिक्षण विभाग सतर्क होता. खुद्द शिक्षणाधिकारी सचिन जगताप तपासणीस निघाले. बोरगाव येथील शाळेत परीक्षार्थी विद्यार्थ्यांची तपासणी सुरू झाली. तेव्हा एका मुलाजवळ भ्रमणध्वनी संच आढळून आला. थक्क झालेल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी संच जप्त केला. तसेच सदर विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका ‘कॉपी’ म्हणून नोंद केली.

हेही वाचा- बुलढाणा : सिंदखेडराजा तालुक्यात नक्कल करणारे दोन विद्यार्थी निलंबित

वर्गात भ्रमणध्वनी बाळगणे बेकायदेशीर असूनही वर्गावरील पर्यवेक्षकाने झडती न घेण्याची चूक केली. तसेच परीक्षेच्या कामावर देखरेख ठेवणाऱ्या केंद्रप्रमुखाने हयगय केल्याचा ठपका ठेवून या दोघांवरही कठोर कारवाईची शिफारस करण्यात आली. तसेच सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पेपर सुरू होण्याच्या पहिल्या दहा मिनिटातच ही कारवाई करण्यात आल्याने केंद्रातील उर्वरित विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण पसरले होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A students mobile phone was found during the 12th examination in wardha pmd 64 dpj