वाशीम : दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी एका शिक्षकाला अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले. याबाबत लोकसत्तामध्ये प्रकाशित वृत्त वाचून खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केले व गृहमंत्री फडणवीस यांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीकाही केली. मालेगाव शहरातील शेलू फाटा परिसरात राहणारे दिलीप धोंडूजी सोनुने हे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. ते सोमवारी दुचाकीने बोरगावला जाण्यासाठी निघाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मालेगांव शहरापासून चार किलोमीटर अंतरावर दबा धरून बसलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. सोबत आणलेले पेट्रोल टाकून पेटवून दिले. यामधे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष होत आहे. गुन्हेगार निर्ढावले असून दिवसा ढवळ्या गुन्हे करीत आहेत. वाशीम जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी लक्ष घालून गुन्हेगारांना गजाआड करावे, असे ट्विटही त्यांनी केले.