नागपूर: ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (बीआयएस)च्या नागपूर शाखेच्या चमूने जालना जिल्ह्यातील पारडगाव रोड येथील मेसर्स प्रयाग फूड प्राॅडक्स या बाटलीबंद पाणी उत्पादकावर छापा टाकला. येथे मुदतबाह्य बीआयएस परवान्यावर व्यवसाय केला जात असल्याचे आढळून आले. या उत्पादकावर आता कारवाई केली जाणार असल्याचे बीआयएयकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

छापा टाकणाऱ्या बीआयएसच्या चमूमध्ये सहसंचालक पीयूष वासेकर, उपसंचालक संदेश गोकनवार, प्रशांत साखरकर, मनीष मुळे यांचा समावेश होता. कंपनीचा आयएएस मार्कसाठी आवश्यक बीआयएस परवाना २०१६ मध्येच मुदतबाह्य झाला होता. त्यानंतरही बाटलीबंद पाणी उत्पादन व विक्री व्यवसाय सुरू होता.

हेही वाचा… परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ ऐवजी ५० ओबीसी उमेदवार; अर्थमंत्र्यांकडे प्रस्ताव अडकला?

चमूला उत्पादकाकडे बीआयएस चिन्हासह सीलबंद प्रत्येकी १ लिटर क्षमतेच्या बाटल्यांचे सुमारे ६३८ बॉक्स आढळले. तसेच १०६ कोरुगेटेड बॉक्स आणि बीआयएस प्रमाणन चिन्हासह ५३२ प्लास्टिक रॅप केलेले बॉक्सही आढळले. हा सर्व मुद्देमाल बीआयएसकडून सिल करण्यात आला. ही कारवाई बीआयएस नागपूर शाखेचे संचालक हेमंत आडे यांच्या सूचनेवरून झाली.