गोंदिया : गावाबाहेर असलेल्या मुरमाच्या खाणीतील खड्ड्यात बुडाल्याने दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पिंपळगाव/खांबी येथे घडली. रजनिश वामन शिवनकर (१०), असे मृताचे नाव आहे. तो मनोजदेव मानकर आदिवासी आश्रम शाळा बोंडगांव देवी येथे इयत्ता चवथीत शिकत होता.

अर्जुनी मोरगाव तालुक्यात गेल्या तिन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सर्वत्र पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. गावागावातील खड्डे व गावाबाहेरील असणाऱ्या मुरमाच्या खाणी पाण्याने तुडुंब भरलेल्या आहेत. अशावेळी तालुक्यातील पिंपळगाव/खांबी येथील वामन शिवनकर यांची दोन्ही मुले अन्य मुलांसोबत पटाची दान परिसरात फिरायला गेले. या परिसरात मुरमाच्या मोठमोठ्या खाणी असून मुसळधार पावसाने तुडुंब भरल्या आहेत. या खाणीत ही मुले आंघोळ करण्यासाठी उतरली. यामधे रजनिश शिवनकर हा दहा वर्षाचा मुलगा खोल पाण्यात गेला. खोल पाण्यात बुडत असताना त्याच्या मोठ्या भावाने रजनिशला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश आले नाही. त्यामुळे इतर घाबरलेली मुले लगेच गावात येऊन लोकांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. कुटुंबीय व गावकरी घटनास्थळी आले. गावकऱ्यांच्या मदतीने मुलाला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत मुलाचा मृत्यू झाला होता.

Young man murdered over dispute over money
हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाचा खून, राजेंद्रनगर ‘एसआरए’ वसाहतीतील घटना
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Vaibhavi Deshmukh News
Santosh Deshmukh Daughter : संतोष देशमुख यांच्या मुलीला अश्रू अनावर, “पप्पा, जिथे असाल तिथे हसत राहा! आम्हाला माफ करा…”
13 yr old sadhvi in mahakumbh
महाकुंभ मेळ्यामध्ये साध्वी होणार IAS अधिकारी व्हायचं स्वप्न पाहणारी मुलगी; चर्चेत असलेली राखी सिंह कोण आहे?
रोलरखाली चिरडून मजुराचा मृत्यू
homosexual, Akola , Marriage for money,
अकोला : पैशांसाठी लग्न, पोलीस पत्नीचा छळ अन् पती निघाला समलैंगिक….
Minor girl sexually assaulted by father in Dombivli
डोंबिवलीत वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
Bhayandar, laborer died, suffocation , sewage tank,
भाईंदर : सांडपाण्याच्या टाकीत गुदमरून एका कामगाराचा मृत्यू, तर दुसरा गंभीर जखमी

हेही वाचा – लैंगिक छळाची तक्रार केली म्हणून नोकरीवरून काढले, मात्र उच्च न्यायालयाने…

माहीती मिळताच अर्जुनी मोर. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोरगाव येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेने परिसरात व पिंपळगाव/खंबी गावात हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुनी मोरगाव ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात या घटनेचा पुढील तपास बिट अंमलदार कोडापे करीत आहेत.

हेही वाचा – जेईई मेन्स परीक्षेत घोळ? विद्यार्थ्याला एकाच ‘रोल नंबर’वर वेगवेगळे गुण

हवालदाराने पोलीस ठाण्यातच विष प्राशन केले

गोरेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार राजेश जौंजाळ (बक्कल नंबर ९३५) यांनी पोलीस ठाण्यातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना १९ जुलै रोजी रात्री उघडकीस आली. घटनेच्या दिवशी राजेश जौंजाळ पोलीस ठाण्यातील खोलीत कार्यरत होते. यावेळी राजेशने कीटकनाशक प्राशन केले. हा प्रकार इतर पोलीस सहकाऱ्यांच्या निदर्शनास येताच एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने गोरेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. येथून प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना गोंदियाला हलवण्यात आले. त्यांच्यावर गोंदिया येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येच्या प्रयत्नामागील कारण अद्याप समजू शकले नाही.

Story img Loader