वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापिठात विद्यार्थ्यांच्या आंदाेलनाने वातावरण तणावपूर्ण झाले असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अभ्यासक्रमात अचानक बदल केल्याने विद्यार्थ्यांना परीक्षेला सामाेरे जाणे कठीण ठरल्याचा आरोप विद्यार्थी नेते करीत आहेत. शोधप्रबंध सादर केल्यानंतर वेळेवर मार्गदर्शक बदल्या जातात. अनेक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी प्रशासकीय गोंधळामुळे अडचणीत आल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी तीन दिवसापासून धरणे आंदोलन सुरू केले.
हेही वाचा >>>अकोला: ‘अपुऱ्या आहारातून मानवाला ८० टक्के आजार’
त्यास प्रतिसाद न मिळाल्याने आजपासून आमरण उपोषण करण्याची भूमिका आंदोलकांनी घेतली. विद्यापीठाने आंदोलक विद्यार्थी परिसरातील शांतता भंग करीत असल्याचा ठपका ठेवला. सहा विद्यार्थ्यांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सायंकाळी पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.