गडचिरोली: राज्यभरातील शासकीय रुग्णालयात मृत्यूंचे तांडव सुरू असताना गडचिरोली जिल्हा देखील लागोपाठ झालेल्या माता मृत्यूने हादरला आहे. महिला व बाल रुग्णालयात ‘सिझेरियन’ प्रसूतीनंतर अत्यवस्थ झालेल्या तिसऱ्या महिलेचा देखील मंगळवारी रात्री नागपुरातील मेडिकल येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा.आष्टी) असे मृत मातेचे नाव असून मुलगी सुखरूप आहे. यापूर्वी दोन मातांचा अशाचप्रकारे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.

२४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके(२३) रा.भानसी,ता.सावली,जि.चंद्रपूर व उज्ज्वला नरेश बुरे(२२), रा.मुरखळा चक, ता.चामोर्शी(हल्ली मुक्काम इंदिरानगर, गडचिरोली), वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा.आष्टी) यांना प्रसूतीसाठी भरती करण्यात आले होते. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
CSMT accident Accused in accident finally found after CCTV examination
सीएसएमटी अपघात : सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर अखेर अपघातातील आरोपी सापडला
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Kurla Bus Accident
Kurla Bus Accident : पहिल्या नोकरीचा पहिलाच दिवस, अन् घात झाला…; घरी परतताना १९ वर्षीय तरूणीला मृत्यूने गाठलं

हेही वाचा… भंडाऱ्यात भर वस्तीत देहविक्री व्यवसाय

प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु संध्याकाळी रजली शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलवण्याचा सल्ला देण्यात आला. दरम्यान, नागपूरला नेण्यात येत असताना रात्री ११ वाजताच्या सुमारास आरमोरीजवळ उज्ज्वला बुरे हिनेही प्राण सोडला. तर वैशालीचा ३ ऑक्टोंबरला उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिघींचेही बाळ सुखरुप आहेत. परंतु आईविना पोरके झाले आहेत. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन मातांना जीव गमवावा लागल्याचा आरोप मृतकांच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेमुळे गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहे. याप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती गठीत केली आहे.

Story img Loader