चंद्रपूर : वरोरा येथील बाबा आमटे यांच्या आनंदवनात ६, ७ व ८ ऑक्टोबरला तीन दिवसीय आनंदवन बिजोत्सोव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात सेंद्रिय शेती, बीज संवर्धन, अन्न सुरक्षा, अन्न प्रक्रिया, मातीची गुणवत्ता तसेच प्रगतशील शेतकऱ्यांची संवाद व चर्चा करण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या आनंदवन बिजोत्साव कार्यक्रमाचे उद्घाटन ६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ, अकोलाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विकास आमटे असणार आहेत. उद्घाटन सत्रानंतर ३.३० वाजता सुभाष शर्मा हे ‘सेंद्रिय शेतीमागचा विचार’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर ४ वाजता योगिनी पाटील, प्राची माहूरकर आणि भूषण नेवे यांनी हे सोमनाथ येथील बीज संवर्धन प्रकल्पाचा परिचय व आपला अनुभव उलगडणार आहेत. बायफचे संजय पाटील हे बियाणे संवर्धनाची गरज आणि शेतकऱ्यांचे योगदान मार्गदर्शन करणार आहे. सांयकाळी ५ वाजता प्रगतीशील शेतकऱ्यांशी परिचय आणि संवाद होणार आहे. तर ७ ऑक्टोबरला सेंद्रिय शेती आणि मातीच्या आरोग्यामागील विज्ञान, मातीचे आरोग्य कसे संरक्षित करावे, पीक रोटेशन आणि व्यवस्थापन, बियाण्यांशी संबंधित कायदे, अन्न सुरक्षा आणि सुरक्षित अन्न यासाठी पारंपारिक बिज, अन्न प्रक्रिया, तरुण शेतकरी या विषयावर मान्यवर वक्ते मार्गदर्शन करणार आहे. ८ ऑक्टोबरला शेतकरी त्यांचे विचार आणि बदलत्या पीकांवर चर्चा, अन्न प्रक्रिया, तरुणांशी चर्चा, व भविष्यात बीजोत्सवाची दिशा ठरविण्यात येणार आहे.

हेही वाचा – ताडोबातील वाघांचा करिष्मा पाहून सारेच अवाक; पर्यटकांनी रोखून धरला श्वास

हेही वाचा – भंडाऱ्यात भर वस्तीत देहविक्री व्यवसाय

या संपर्ण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आनंदवनच्या वतीने पल्लवी आमटे, सुधाकर कडू, डॉ दिलीप पेशवे, डॉ सुहास पोतदार, हर्षदा पोतदार, सुभाष शर्मा, वसंत फुटाणे यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A three day anandwan bijotsav at anandwan seminars and guidance on agriculture soil rsj 74 ssb
Show comments