नागपूर: दिवाळीच्या सुट्यात मावशीकडे पाहुणे म्हणून आलेल्या चिमुकल्या बहिण-भावाच्या अंगावर लोखंडी दरवाजा पडला. यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घटना घडली. यज्ञा शरद भाजीखाये (३, गिदमड, आडेगाव, हिंगणा) असे मृत चिमुकलीचे नाव आहे तर कौस्तुभ (५) असे जखमी भावाचे नाव आहे.

बोखारा येथील बजरंग नगरातील साईप्रसाद सोसायटी येथे शरद भाजीखाये यांचे साळभाऊ मनोज प्रल्हाद गजभिये (५५) हे राहतात. दिवाळीच्या सुट्या असल्यामुळे यज्ञा आणि कौस्तुभ हे मावशीकडे बोखारा येथे आले होते. मावशीच्या घरी नवीन स्लायडर गेटचे काम सुरू होते. त्यासाठी लोखंडी गेट ठेवले होते. मंगळवारी सायंकाळी यज्ञा व कौस्तुभ हे दोघेही अंगणात खेळत होते. खेळताना त्यांच्या अंगावर लोखंडी गेट पडले. गेटचे वजन खूप जास्त असल्याने दोघेही खाली दबले. मुलांचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची आई, मावशी व इतर नातेवाईक धावत बाहेर आले.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
tigress seriously injured in train collision while crossing road
रस्ता ओलांडताना रेल्वेची जबरदस्त धडक आणि वाघीण…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

हेही वाचा… नागपूर : ५० टेबलांवर शवविच्छेदन, शेकडो रुग्णांवर उपचार, ‘मेडिकल’च्या डॉक्टरांनी सांगितले गोवारी हत्याकांडानंतरचे अनुभव

दोन्ही चिमुकल्यांना जखमी अवस्थेत पाहून त्यांच्या गोंधळ उडाला. त्यांनी गेट बाजुला गेले. यज्ञाच्या डोक्याला जबर मार बसला होता, तर कौस्तुभदेखील जखमी झाला होता. यज्ञाला उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. गजभिये यांनी दिलेल्या सूचनेनुसार कोराडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.