नागपूर : ताडोबा बफर क्षेत्र खडसंगी वनपरिक्षेत्रअंतर्गत वाहानगाव येथे दोन वाघाच्या झुंजीत एका वाघाचा मृत्यू झाला.तर एक वाघ गंभीररित्या जखमी असून तो घटनास्थळी बसून आहे ही घटना मंगळवार, १४ नोव्हेंबर ला वाहनगाव येथील सुभाष दोडके यांच्या शेतात घडली.
वाघाला बघण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे.वाघांचे वय जवळपास सहा ते सात वर्षाचे आहे. वनखात्याची चमू घटनास्थळी पोहचत आहे