अमरावती: मेळघाट प्रादेशिक वनविभागाच्‍या अंतर्गत सुसर्दा वनपरिक्षेत्रातील हिराबंबई वन वर्तूळात एका वाघाचा मृत्‍यू झाल्‍याने निदर्शनास आले आहे. हिराबंबई नजीक जंगलात वन कर्मचारी नियमित गस्‍तीवर असताना गुरूवारी सकाळी एक वाघ मृतावस्‍थेत आढळून आला. वाघाचा मृत्‍यू नैसर्गिक असल्‍याने वन अधिकाऱ्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी डेहनकर यांनी घटनास्‍थळी पोहचून पाहणी केली. गेल्‍या ऑगस्‍टमध्‍ये धारणी तालुक्‍यातील दादरा गावानजीक वाघाचा वावर आढळून आला होता.

हेही वाचा… “माळ घालाल तर घरी येतो…” सातारकर महाराजांच्या नागपुरातील या आहेत आठवणी….

प्रादेशिक वनविभागाच्‍या सुसर्दा वनपरिक्षेत्रातच हा भाग येतो. अकोट वन्‍यजीव विभागाचे जंगल लागूनच असल्‍याने वाघाचे स्‍थलांतर या भागात होत असते, असे सांगण्‍यात आले आहे.

Story img Loader