भंडारा : भंडाऱ्याहून पवनीकडे दुचाकीने जात असताना दवडीपार बीटअंतर्गत येणाऱ्या भंडारा-पवनी मार्गावरील कोसेवाडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या वाघाने दुचाकीला धडक दिली. यात दिपक फुंडे व त्यांची आई पुष्पा फुंडे हे दोघेही जखमी झाले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कोसेवाडी परिसरात वन्यप्राण्यांचा दिवसाढवळ्यासुद्धा संचार असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – इरई, झरपट नदी खोलीकरण व सौंदर्यीकरण प्रकरणात सिंचन विभागही प्रतिवादी

हेही वाचा – चंद्रपूर महापालिकेतील नोकरीसाठी सादर केले बनावट अनुभव प्रमाणपत्र; दोघांविरोधात पोलिसांत तक्रार

बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास दिपक फुंडे (रा. आसगांव ता. पवनी) हे त्यांची आई पुष्पा फुंडे यांच्यासोबत भंडाऱ्याहून गावाकडे जाण्यास निघाले. अशातच कोसेवाडी परिसरात रस्ता ओलांडणाऱ्या वाघाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीचे संतुलन बिघडले आणि दोघेही खाली पडले. माहिती मिळताच दवडीपारचे क्षेत्र सहायक,‌ बिटरक्षक, पहेलाचे बिटरक्षक यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A tiger hit a bike son mother injured incidents in bhandara district ksn 82 ssb