गोंदिया : जिल्ह्यातील कोहमारा-मुरदोली घनदाट जंगल परिसरात मंगळवार, ४ मार्च रोजी रात्री एक वाघीण आणि तिचे चार बछडे अचानक रस्त्यावर आले. हे पाहून प्रवाशांना धक्काच बसला. हळूहळू वाघीण आणि बछड्यांनी रस्ता ओलांडला आणि मग कुठे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

हा परिसर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्यामुळे येथे वाघ, बिबट्यांसह वन्यप्राण्यांचे दर्शन होतच असते. मात्र, वाघीण आपल्या बछड्यांसह थेट रस्त्यावर आल्यामुळे प्रवाशांना धडकी भरली. एका प्रवाशाने हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टिपले. या परिसरात शेती आणि वाघोबाचे मंदिर असल्यामुळे येथे शेतकरी, पाळीव जनावरे आणि पर्यटकांचा वावर असतो. हे पाहता वनविभागाने तातडीने प्रवासी आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उपाय योजावे, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा – नागपूर : ‘संविधान प्रास्ताविका पार्क’मध्येही कुलगुरूंचे ‘राजकारण’!; पाया रचणाऱ्यांनाच समितीमधून काढले

हेही वाचा – वर्धा : तहानलेल्या वन्यप्राण्यांसाठी मनुष्यप्राण्याची जंगलाकडे धाव; टँकर व बैलगाडीने पाणी पुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मंगळवारी रात्री दर्शन झालेल्या वाघीण आणि तिच्या चार बछड्यांचे ‘लोकेशन’ त्याच परिसरात असल्याची माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक पाटील यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना दिली. परिसरातील शेतकरी व नागरिकांनी या मार्गावरून ये-जा करताना सतर्कता बाळगावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.