संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा: वन्य संपदेचे वरदान लाभलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील वन्यजीव विभाग व लाखो वन्यजीव प्रेमींसाठी एक ‘गुड न्यूज’ आहे! जिल्ह्यातील जखमी वन्यप्राण्यांना उपचारासाठी शेकडो किलोमीटर अंतरावर नेण्याची गरज राहणार नाहीये. याचे कारण आता लवकरच खामगाव तालुक्यात कोलकाताच्या धर्तीवर अत्याधुनिक वन्यजीव उपचार केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी साडे दहा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

Graded Response Action Plan project to monitor air pollution Pune news
पिंपरी: हवा प्रदूषणावर आता ‘ग्रॅप’ची नजर; प्रदूषण करणारे उद्योग…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Work begins on Shirsodi Kugaon bridge in the catchment area of ​​Ujani Dam Pune news
इंदापूर-करमाळा ऋणानुबंध पुन्हा जुळणार; शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात
process of regularizing project affected constructions gained momentum after return of mahayuti government
गरजेपोटी बांधकामांच्या नियमितीकरण प्रक्रियेला वेग; तांत्रिक मूल्यमापनाचे काम अंतिम टप्प्यात
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !

यामुळे जिल्ह्यातील ज्ञानगंगा, अंबाबरवा व लोणार अभयारण्य मधील जखमी प्राण्यांवर उपचार करण्यासाठी त्यांना शेकडो किलोमीटर अंतरावरील नागपूर वा पुणे येथे नेण्याची गरज राहणार नाही. यामुळे त्यांना जीवदान मिळण्याची जास्त शक्यता राहणार आहे.

आणखी वाचा- रेल्वे मालगाडीच्या इंजिनवर आढळला बिबट्याचा मृतदेह; वन व रेल्वे खात्यात खळबळ

खामगांव विधानसभा मतदार संघात बुलढाणा प्रादेशीक वन विभाग खामगांव वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य आहे. तसेच जळगाव जामोद मतदारसंघात अंबाबरवा अभयारण्य आहे. याशिवाय लोणार सरोवर परिसरात संरक्षित क्षेत्र आहे. शेकडो हेक्टर मध्ये पसरलेल्या या जंगलात बिबट, अस्वल, काळविट, निलगाय, साळींदर, अस्वल, मोर, अनेक प्रकारचे संरक्षीत पशुपक्षी आहेत. नैसर्गिक कारण वा मानवी अपघातामुळे अनेक वेळा प्राणी जखमी किंवा आजारी असतात. या प्राण्यांना योग्य उपचार न मिळल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात. यासाठी खामगांव मतदार संघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे नवीन ‘ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर’ स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली होती. त्यांनी केलेल्या पाठपुराव्याने खामगांव तालुक्यातील जनुना येथे मंजूर हे आधुनिक उपचार केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

आणखी वाचा- वाशीम : वादळाच्या तडाख्याने १५० वर्षांपेक्षा अधिक जुने पिंपळाचे झाड कोसळले; गहू, आंब्याचे नुकसान

दूरवरची केंद्र प्राण्यांच्या मुळावर

सद्यस्थ‍ितीत दूरवरच्या नागपूर व पुणे येथेच वन्यजीवांना उपचारार्थ न्यावे लागते. जत्यांना उपचारार्थ नागपूर अथवा पुणे येथे नेण्यास ३०० ते ५०० किमी चा प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांचे जिवीतास हानी पोहचते.

दुसरीकडे अभयारण्यात अस्वलांची मोठी संख्या आहे. या अस्वलांचे संरक्षणासाठी व उपचारार्थ विशेष सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलढाणा यांनी डिसेंबर २०२२ मध्ये वनविभागास परिपुर्ण प्रस्ताव सादर केला आहे.

Story img Loader