पारस येथे बाबूजी महाराज संस्थांन मंदिरातील सभामंडपावर वृक्ष उन्मळून पडल्याने त्याखाली दबून सात भाविकांचा मृत्यू झाला. २६ जण जखमी झाले. नैसर्गिक आपत्तीमुळे ही दुर्दैवी व वेदनादायक घटना घडली. या ठिकाणी असाध्य आजार बरे करण्याच्या नावावर दरबार भरत होता. त्यामुळे हे अंधश्रद्धेचे बळी असून संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे राज्य कार्यकारिणी सदस्य शरद वानखडे यांनी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>>वर्धा जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने पपई, संत्रा, गहू, हरभऱ्याचे मोठे नुकसान; उन्हाळी भाजीपाला मातीमोल

बाळापूर तालुक्यातील पारस गावात बाबूजी महाराज संस्थानामध्ये दर रविवारी पश्चिम विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक येतात. कालही भाविकांनी गर्दी केली असताना वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यावेळी सभामंडपावर वृक्ष कोसळून सात जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले. अंधश्रद्धेमुळेच हे बळी गेल्याचा आरोप ‘अंनिस’ने केला आहे. यासंदर्भात ‘अंनिस’चे शरद वानखडे म्हणाले, पारस येथे दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेतील सात बळी अंधश्रद्धेतूनच गेले आहेत. दर आठवड्याला त्या ठिकाणी दरबार भरत होता, असे स्थानिक लोक सांगतात. त्याठिकाणी नेमके काय प्रकार घडत होते, कुठले अघोरी उपचार केले जात होते? याची सखोल चौकशी प्रशासनाने करावी. संबंधितांवर जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.