नागपूर : बंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या विस्तारा एअरलाइनच्या विमानात अचानक एका दोन वर्षांच्या मुलीची प्रकृती बिघडली. तिला श्वास घेता येत नव्हता. तातडीने हे विमान नागपूरकडे वळण्यात आले. सुदैवाने या विमानातून पाच डॉक्टर प्रवास करीत होते. त्यांनी या चिमुकलीचा जीव वाचवला.
२७ ऑगस्ट रोजी बंगळुरूहून दिल्लीला येत असलेल्या विस्तारा एअरलाइनच्या यूके-८१४ या विमानात दोन वर्षांची मुलगी अचानक आजारी पडली. मुलाला “सायनोटिक” आजाराने ग्रासले होते. मुलीची तब्येत इतकी बिघडली की ती बेशुद्ध झाली. मुलीला असे पाहून विमानात उपस्थित असलेले लोक घाबरले. दरम्यान, विमानात उपस्थित असलेल्या दिल्ली एम्सच्या पाच डॉक्टरांनी मुलीला वाचवले.मुलीची प्रकृती बिघडल्याचे डॉक्टरांना कळताच त्यांनी तातडीने तपासणी करून घेतली. बाळाची नाडी बंद होती, हात-पाय थंड होते, श्वास घेत नव्हता. एवढेच नाही तर त्याचे ओठ आणि बोटेही पिवळी पडली होती. विमानातील डॉक्टर उपचार करीत होते. तेव्हा मुलीला हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांसमोरील अडचणी वाढल्या.
हेही वाचा >>>पती व सासूची गर्भवती महिलेला जबर मारहाण; नवजात बाळ दगावले
हेही वाचा >>>विवाहित महिलेचा लग्नास नकार, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल…
यावेळी डॉक्टरांनी सुमारे ४५ मिनिटे मुलीवर उपचार केले. ४५ मिनिटे उपचार केल्यानंतर विमान नागपूरला उतरवण्यात आले. येथील बालरोग तज्ज्ञांकडून तपासणी करण्यात आली. मुलीची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे. या घटनेबाबत दिल्ली एम्सने सोशल माध्यमांवर दुजोरा दिला आहे.