अकोला : संपूर्ण ऑगस्ट महिन्यात खगोलीय घडामोडींचा अनोखा मेळा राहणार आहे. आकाशात महिन्याभरात १२ ठळक नजाऱ्यांचे दर्शन घडून येणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही मोठी पर्वणी ठरणार असल्याची माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले.

यंदाचा ऑगस्ट महिना खगोलप्रेमींसाठी अवकाशातील अनोख्या घटनांची मेजवानी घेऊन आला आहे. १ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चंद्रकक्षेत गेल्याचा महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला. याच दिवशी काहीशा ढगांच्या लपंडावात ‘सुपरमून’ अनुभवला. ५ ऑगस्ट रोजी आकाशात अंतराळ केंद्राचे दर्शन घडले. ८ ऑगस्ट रोजी अत्यंत तेजस्वी असलेल्या शुक्राचा पश्चिमेस अस्त आहे. यालाच ग्रामीण भागातील लोक चांदणी बुडी गेली, असे म्हणतात. ९ ऑगस्ट रोजी दक्षिण क्षितिजावर अत्यंत रंगीत असलेल्या अगस्त्य ताऱ्याचा उदय होईल. गेल्या तीन महिन्यांपासून न दिसणारा तारा बघता येणार आहे. १२ आणि १३ ऑगस्ट रोजी पूर्व क्षितिजावर रात्री एकच्या नंतर ययाती तारका समुहातून विविध रंगी उल्का पडताना दिसतील. त्यांचा वेग हा दर ताशी ६० च्या जवळपास असेल, पहाटे त्याचा वेग वाढेल. १३ ऑगस्टलाच बुध आणि मंगळ या दोन ग्रहांची युती आपल्याला पश्चिमेस सायंकाळी बघता येईल. चंद्राप्रमाणेच शुक्राची अमावस्या १३ ऑगस्ट रोजी सूर्य, शुक्र व पृथ्वी एका रेषेत येईल. १६ या दिवशी चंद्र पृथ्वीपासून दूर जात असल्याने चंद्रबिंब आकाराने लहान राहणार आहे, असे दोड यांनी सांगितले.

Shani Pluto Ardhakedra Yog
२२ जानेवारीला शनि-यम निर्माण करणार शक्तीशाली योग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, अचानक होईल धनलाभ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Mangal rashi parivrtan 2024
येणारे ७० दिवस मंगळ करणार कृपा; ‘या’ तीन राशींची होणार चांदी
Shadashtak Yog 2025
आजपासून बुध-मंगळ निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ तीन राशीचे व्यक्ती भरपूर पैसा कमावणार
Shani Pluto Ardhakedra yog
२२ जानेवारीपासून शनी घेऊन येणार गडगंज श्रीमंती; अर्धकेंद्र योग ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब बदलणार
Nagpur planets loksatta
नागपूर : खगोलप्रेमींसाठी विशेष पर्वणी! सात ग्रह एकाच वेळेला बघता येणार….
moon of Venus , Akola, space lovers Akola, Venus ,
काय सांगता? भरदिवसा शुक्राच्या चांदणीचे दर्शन! अवकाशप्रेमींसाठी अनोखी पर्वणी
Venus Transit in Purva Bhadrapada
१७ जानेवारीपासून ‘या’ तीन राशींचे भाग्य चमकणार; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने मिळणार प्रेम, पैसा अन् भौतिक सुख

हेही वाचा – एसआरएतील गाळे हस्तांतरण करा केवळ २०० रुपयांत

हेही वाचा – अकोला : टेबल टेनिस प्रशिक्षकाने अल्पवयीन मुलीशी केले अश्लील चाळे; न्यायालयाने गंभीर दखल घेत…

नुसत्या डोळ्यांनी दिसणारे पाचही ग्रह १८ ऑगस्टपासून आपल्यासाठी दर्शनार्थ सज्ज असतील. याच दिवशी शुक्राचा पहाटे पूर्वेला उदय होत आहे. सोबतच सुरुवातीला शनी ग्रह रात्रीच्या प्रारंभी कुंभ राशीत तर गुरू ग्रह त्यानंतर आपल्याला दर्शनासाठी मेष राशीत सज्ज राहील. सायंकाळी मंगळ व बुध हे ग्रह युती स्वरुपात एकमेकाजवळ पश्चिमेस पाहता येतील. २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे चंद्रावर अवतरण होणार आहे. २७ ऑगस्ट रोजी सूर्य, पृथ्वी व शनी हे एका रेषेत येत असल्याने शनीग्रह रात्रभर दर्शन देत राहील. यानंतर ३१ ला चंद्र पृथ्वीपासून जवळ आल्याने या वेळी ‘ब्ल्यू सुपरमून’ बघता येईल. आकाशातील विविध महत्त्वाच्या घटनांचा खगोलप्रेमींनी आनंद घेण्याचे आवाहन दोड यांनी केले आहे.

Story img Loader