भंडारा : धान कापणीसाठी महिला मजूर घेऊन जांभोऱ्याहून मोहाडीकडे जाणारी टाटा सुमो गाडी दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात असंतुलित होऊन उलटल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास मोहाडी तालुक्यातील मुंढरी बुज गावाजवळ घडली. या अपघातात चालकासह दोन महिला गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. १८ जण किरकोळ जखमी आहेत. गंभीर जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यात सध्या सर्वत्र धान कापणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मजूरवर्ग सकाळच्या सुमारास धान कापणीच्या कामासाठी एका गावाहून दुसऱ्या गावाला किंवा जिल्ह्याबाहेरसुद्धा जात आहेत. मोहाडी तालुक्यातील जांभोरा येथील जवळपास १८ महिला आणि २ पुरुष असे २० मजूर आज सकाळी मोहाडी येथे धान कापणीच्या कामासाठी निघाले. हे सगळे एका टाटा सुमो गाडीत बसले. साडेदहा वाजताच्या सुमारास गाडी मुंढरी बुज गावाजवळ पोहोचली असताना समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाने वेग वाढविला. मात्र गाडी असंतुलित झाल्याने उलटली.
चालकासह दोन महिला मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. जखमींना बाहेर काढले. नंतर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गायकवाड पुढील तपास करीत आहे.

हेही वाचा – आमदारांच्या सामूहिक छायाचित्रावरून नाराजी, वेळ ठरवूनही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री….

हेही वाचा – दारूबंदी जिल्ह्यांत दारूविक्री जोमात! बेकायदेशीर पुरवठा करणाऱ्या कायदेशीर दारुविक्रेत्यांवरही कारवाईचा बडगा

क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी?

वाहनाच्या क्षमतेपेक्षा अधिक मजूर या वाहनातून प्रवास करीत होते. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी नेण्याची परवानगी दिली कोणी ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबणे आणि हलगर्जीपणा या अपघातास कारणीभूत ठरला.