चंद्रपूर : वैविध्याने समृद्ध जिल्ह्यातील जंगलात अतिशय दुर्मिळ पिवळा पळस मिळाला आहे. हा पळस अनेक अर्थांनी गुणकारी असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील जंगलात वाघ, बिबट, अस्वल, चितळ, हरीण या वन्य प्राण्यांसोबत विविधांगी पक्षांचेदेखील वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांचेदेखील येथे अस्तित्व आहे. तर विविध फुलपाखरू आहेत. वनस्पतीच्या असंख्य प्रजाती आहेत. रानमेवा, औषध म्हणून वापरल्या जाणाऱ्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आहे. विविधरंगी पाने, फुले, झाडे आहेत. यात आता आणखी एक भर पडली आहे ती पिवळ्या रंगाच्या पळसाची.

हेही वाचा – ‘मार्च एन्ड’च्या नावाखाली वाहतूक पोलिसांचा कारवाईचा धडाका; वर्षभराच्या उदिष्टपूर्तीसाठी चौकाचौकात पथके

चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्लीच्या जंगलालगत एका शेतात तलावाच्या शेजारी पिवळ्या रंगाचा पळस पाहावयास मिळतो. औषधीयुक्त गुणांचा आणि अतिशय दुर्मिळ असा हा पिवळ्या रंगाचा पळस आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. पांढरा, निळा, पिवळा आणि लाल अशा चार रंगांत पळस उपलब्ध असले तरी यातील साधारणत: लाल रंगाचा पळस संख्येने जास्त आहे. ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा पळस आहे त्याचा विरोध असतानाही एक खांदा बाहेरचे लोक तोडून घेऊन गेले आहेत, असे ते सांगत होते. याला शेंगा लागलेल्या आहेत, यांच्यातून नवीन झाड यावर्षी करायचा प्रयत्न आम्ही करणार आहोत, असे ते म्हणाले.

हेही वाचा – उपराजधानीसह विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज, शेतकरी चिंतेत

येथील छायाचित्रकार देवानंद साखरकर यांच्यामुळे हा दुर्मिळ पळस पहायचा योग येथील वनस्पती व प्राणी अभ्यासकांना प्राप्त झाला, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित सर, शरद पवार कॉलेज गडचांदूरचे प्राचार्य डॉ. संजय सिंग, प्रा. योगेश दुधापाचारे यांच्यासह अनेकांनी वेळातून वेळ काढून हा पळस बघितला व त्याचे वैशिष्ट्य सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A very rare yellow palas plant with medicinal properties found in the forest of chandrapur rsj 74 ssb