लोकसत्ता टीम

नागपूर: उन्हाचा दाह कुणालाही सोसवेना होतो, मग तो माणूस असो वा प्राणी. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनी ताडोबातील बबली आणि तिच्या बछड्यांचा असाच एक पाण्यात मस्ती करत असतानाचा व्हिडीओ शूट केला आहे.

Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Crowds flocked to center area of pune on Friday night to watch the spectacle
पुणे : मध्यभागातील रस्ते गर्दीने फुलले! सलग सुट्यांमुळे सहकुटंब देखावे पाहण्याचा आनंद
minor girl sexually assaulted in west bengal
West Bengal Crime : संतापजनक! पश्चिम बंगालच्या हुगळीमध्ये अल्पवयीन तरुणीवर लैंगिक अत्याचार; बेशुद्ध अवस्थेत रस्त्यावर आढळली
Traffic jam on Ghodbunder road thane
‘ठाणेकर’ होऊन रहाण्याच्या हौसेवर कोंडीचे विरजण
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू
Body of woman found in riverbed in Kharadi identified brother and sister-in-law killed over property dispute
खराडीतील नदीपात्रात सापडलेल्या महिलेची मृतदेहाची ओळख पटली, संपत्तीच्या वादातून सख्खा भाऊ आणि वहिनीने केला खून
human dead body Nehroli, Nehroli ,
पालघर : नेहरोली गावातील एका बंद घरात आढळले तीन मानवी सापळे, हत्या झाल्याचा संशय
व्हिडीओ – इंद्रजित मडावी

ताडोबा – अंधारी व्याघ्रप्रकल्पातील “बबली” च्या अदांवर पर्यटक फिदा आहेत. “बबली बदमाश है..” असे म्हणत पर्यटकांनीच तिला या नावाने हाक मारायला सुरुवात केली. आईवर जाणार नाहीत ते बछडे कसले! “बबली” चे बछडेदेखील तिच्याच वळणावर गेले असून ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील अलिझंझा बफर क्षेत्रातील पाणवठ्यावर त्या दोघांनीही तेवढीच मस्ती केली. काही अघटित घडू नये म्हणून मात्र बबली त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून होती.

हेही वाचा… धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नागपूर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न

उन्हाळ्यात उन्हाचा दाह माणसांना सोसवत नाही, तिथे वन्यजीवांना त्रास होणारच. माणसासारखे ते एसी किंवा कुलरच्या हवेत बसू शकत नाही. त्यांच्यासाठी उरतो तो एकच पर्याय आणि तो म्हणजे पाणवठ्यात मनसोक्त डुंबणे. “बबली”चेच बछडे ते… मागे कसे राहणार! अलिझंझा बफर क्षेत्रातील हा पाणवठा म्हणजे त्यांच्यासाठी मनसोक्त मस्ती करण्याचे ठिकाण. वन्यजीव छायाचित्रकार इंद्रजित मडावी यांनाही मग त्यांची ही मस्ती कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह आवरला नाही.