वर्धा: सावंगी पोलीस ठाण्याचे हद्दीत एका विकृत युवकास अटक करण्यात आली आहे. वीस वर्षीय पीडिता शिकवणीस जात असताना आरोपी वैभव राजेंद्र भानसे याने दुचाकीवर तिचा पाठलाग केला. रस्त्यात अडवून जीव घेण्याची धमकी देत सदर विद्यार्थिनीला गाडीवर बसवून धूम ठोकली.
पुढे सावंगी ते पालोटी रस्त्यावर एका पडक्या झोपडीत पिडीत मुलीला धाक दाखवीत घेवून गेला. या ठिकाणी आरोपीने अत्याचार केला.त्याच वेळी फोटो घेतले व व्हिडिओ पण काढला. एव्हढ्यावरच न थांबता आरोपीने हा व्हिडिओ तिच्या नातेवाईकांच्या मोबाईलवर पाठविला. पिडीत मुलीने या प्रकरणी सावंगी पोलीसांकडे तक्रार दाखल केली. अत्याचार व बदनामी केल्याप्रकरणी आरोपी भानसे यास त्याच्या राहत्या घरून अटक करण्यात आली आहे.