नागपूर : पर्यावरणाशी नाते जोडायचे असेल तर अनेक मार्ग सापडतात. प्रत्यक्षात काम करता येत नसेल तरी संदेशाच्या माध्यमातूनही पर्यावरण संवर्धनाचे काम करता येते. सध्या अधीच एक पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश देणारी लग्नपत्रिका चर्चेचा विषय ठरली आहे. पर्यावरणाचे निसर्गाशी नाते जोडण्याचा प्रयत्न आम्ही डिजिटल लग्नपत्रिकेच्या माध्यमातून केला आहे. सामाजिक बांधिलकीचा वसा जोपासून लग्न पत्रिकेच्या माध्यमातून पर्यावरण, निसर्ग आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासोबत जनजागृती करण्याचा प्रयत्न अमरावती जिल्ह्यातील चौधरी कुटुंबीय करत आहेत.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी’ या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी टाकण्यात आल्या आहे. याद्वारे झाडे लावा, झाडे जगवा, हिरवळीद्वारे मानवाचे कल्याण होईल, तसेच पर्यावरण, निसर्ग, वन्यजीव यांचे संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. लग्न पत्रिकेवर देवीदेवतांच्या फोटोऐवजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि अनाथांची माई पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचे छायाचित्र, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आज्ञापत्र, तसेच ऐतिहासिक वारसा जपण्याचा संदेश देण्यासाठी रायगड किल्ल्याचे छायाचित्र छापले आहे. या उपक्रमाचे संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होत असून लग्नासोबतच लग्नपत्रिकेतील संदेशाची सर्वत्र चर्चा होत आहे. लग्नपत्रिकेमधील जागेचा वापर विविध सामाजिक समस्यांबाबत जनजागृती करण्यासाठी करण्यात आला आहे.

uma badve s swalekhan App
‘स्वलेखन’ ॲपद्वारे दृष्टीहिनांना डिजिटल युगाचे दार खुले करणाऱ्या उमा बडवे
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
transplant artificial limb for injured cow in mumbai
जखमी गायीला कृत्रिम पाय; प्रत्यारोपणाची पहिली आणि यशस्वी शस्त्रक्रिया
Dermatologists approached high court to stop dentists from performing skin related surgeries
सौंदर्याशी संबंधित शस्त्रक्रियांवरून दंतरोग तज्ज्ञ आणि त्वचा रोग तज्ज्ञांमध्ये का जुंपली? हा मुद्दा वादाचा का ठरतोय?
Reservation and privilege should also be sub categorized
आरक्षण आणि सत्तालाभाचेही उपवर्गीकरण व्हावे!
Dentists are challenged to perform cosmetic and hair transplant surgery Mumbai print news
दंतचिकित्सकांना सौंदर्य आणि केस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याला आव्हान
mpsc preparation strategy
MPSC ची तयारी : पर्यावरण भूगोल, अवकाशीय तंत्रज्ञान आणि सुदूर संवेदन    

हेही वाचा – उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात जात आहात, शासकीय वसतिगृहांमध्ये मोफत प्रवेशाचा लाभ घ्या, मुलींसाठीही संधी, या तारेखपर्यंत…

सामाजिक संदेशांनी बहरली डिजिटल लग्नपत्रिका…!

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या राष्ट्रीय स्वच्छता अभियानाचे संकेत चिन्ह, स्वच्छ भारत अभियानाचा महात्मा गांधी यांचा चष्मा असून त्या चष्म्यावर वर वधूचे नाव प्रकाशित करण्यात आले आहे. समाजसेवा, मुल्यशिक्षण व पर्यावरण रक्षण यातूनच होईल देशाचे संरक्षण, आयुष्याचा एकच प्रण, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन, स्वस्थ पर्यावरणाचे प्रतीक आणि जैवविविधतेचा मानबिंदू “वाघ” वाचवा सृष्टी वाचवा, चला करू पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन – शेतीसाठी वापरू सुक्ष्मसिंचन, मानवसेवा हीच ईश्वरसेवा, स्वच्छ भारत अभियान… एक कदम स्वच्छता की ओर, स्वच्छतेतून समृद्धीकडे, आयुष्याचा एकच प्रण, गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि जतन, स्वस्थ पर्यावरणाचे प्रतीक आणि जैवविविधतेचा मानबिंदू वाघ वाचवा सृष्टी वाचवा, मानवसेवा हीच ईश्वरसेवा, मतदान : माझा हक्क व कर्तव्य इत्यादी सामाजिक संदेशांनी डिजिटल लग्नपत्रिका बहरली आहे.

हेही वाचा – मानसिक त्रास देण्यासाठी प्राचार्यांनी दिले महिला कर्मचाऱ्यांच्या वाहनातील हवा सोडण्याचे आदेश, प्राचार्यांच्या अजब प्रतापाविरोधात….

लग्नपत्रिकेत आणखी काय?

लग्नपत्रिकेत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा संदेश दिला आहे. तसेच शासनाच्या ध्येय-धोरणांची जनजागृती यातून करण्यात आली आहे. पर्यावरणाशी, निसर्गाशी नाते जोडण्याचा आगळा-वेगळा उपक्रम आहे. अनेक सामाजिक संदेशांनी लग्नपत्रिका बहरली आहे, असे चौधरी कुटुंबियातील मुकेश चौधरी यांनी सांगितले.