गडचिरोली : मागील अडीच वर्षांपासून ओडिशाहून स्थलांतरित झालेल्या रानटी हत्तींनी गडचिरोली जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. हा एकूण २३ हत्तींचा कळप असून यांच्या उपद्रवामुळे सीमाभागातील घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या कळपातील एक हत्ती भरकटून रस्त्यावर आल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. भरकटलेल्या या हत्तीची चित्रफीत सर्वत्र प्रसारित झाली आहे.

हेही वाचा – मध्य रेल्वेच्या ९ ते २३ ऑगस्टदरम्यान वेगवेगळ्या तारखांना १९ गाड्या रद्द; वाचा कारण काय ते….

Farmer killed in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Two youths died after drowning in a tank in Bhalivali vasai news
भालिवली येथील कुंडात बुडून दोन तरुणांचा मृत्यू
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
second phase of tiger migration is complete with another tigress captured from Tadoba
दुसरी वाघीणही महाराष्ट्रातून पोहोचली ओडिशात…आंतरराज्यीय स्थलांतर अखेर…
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
flat Palava Colony animals, Dombivli Palava Colony animals, Dombivli flat animals
डोंबिवली पलावा वसाहतीमधील अलिशान सदनिकेतून विदेशी वन्यजीव जप्त, ठाणे वन विभागाची कारवाई

हेही वाचा – नागपूर : काटोल-नरखेडमध्ये असं काय घडलं की, एक हजार मुलींना द्यावी लागली ‘एचपीव्ही’ची लस

जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात मागील आठवडाभरापासून रानटी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घातला आहे. या भागात हत्तींनी अनेक घरांची मोडतोड केली असून शेतीचीही मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे. दरम्यान या कळपातून भरकटलेल्या एका रानटी हत्तीचा आरमोरी मार्गावर मुक्त संचार पाहायला मिळाला. यावेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हत्तीचा मुक्तसंचार मोबाईलमध्ये टिपला आहे. सुदैवाने हत्तीने हल्ला केला नाही. त्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मात्र, आपल्या दिशेने येणाऱ्या हत्तीला पाहून काही वेळेसाठी उपस्थितांची तारांबळ उडाली होती.