बुलढाणा शहरात शिवजयंतीची धामधूम सुरू असतानाच आज एका पीडित महिलेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या दक्षतेमुळे संभाव्य अनर्थ टळला.
हेही वाचा- नागपूर : वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी पैसे घेतल्याचा ‘व्हिडिओ व्हायरल’
पीडित महिलेने आपल्यावरील अत्याचाराची तक्रार नांदुरा पोलीस ठाण्याला दिली. याप्रकरणी पोलिसांनी नाममात्र कारवाई केल्याचा महिलेचा आरोप आहे. त्यामुळे आरोपींवर कारवाई करावी, नांदुरा ठाणेदाराविरुद्ध १८ फेब्रुवारीपर्यंत कारवाई करावी अन्यथा जिल्हा कचेरीसमोर आत्महत्या करू, असा इशारा या महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकारी व राज्य महिला आयोगाला दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता. आज या महिलेने संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास जिल्हा कचेरी समोर विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र परिसरात हजर असलेल्या बुलढाणा पोलिसांनी तिला ताब्यात घेतल्याने संभाव्य अनर्थ टळला. महिलेला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.