चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यावेळी तालुक्यातील मौजा सिरकाडा या गावात प्रदीप यादव बोरकर यांच्या शेतात निंदनाचे काम सुरू असताना दुपारी एक वाजताच्या सुमारास वीज कोसळून महानंदा मोतीराम अलोणे (६४ ) ही महिला ठार झाली तर अन्य एक महिला जखमी झाली.
हेही वाचा – तब्बल १५० सरकारी पदांसाठी भरती, सुशिक्षित बेरोजगारांना सुवर्णसंधी
हेही वाचा – बाप्पांची आरती ‘सुखकर्ता दुखहर्ता’चे रचियता कोण? असा आहे इतिहास व अर्थ
जिल्ह्यात आज सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. अशातच सिंदेवाहीत मुसळधार पाऊस झाला. शेतात काम करणाऱ्या महिला घराकडे जाण्यासाठी निघाले असता वीज पडून महानंदा मोतीराम अलोणे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. रोषणा प्रफुल गेडाम ही महिला जखमी झाली.