चंद्रपूर : सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या व्याहड खुर्द उपवनक्षेत्रातील वाघोली बुटी येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. प्रेमीला मकरू रोहणकर, असे मृत महिलेचे नाव आहे. एका आठवड्यात दुसऱ्यांदा घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नितीन गडकरींचे सहकुटुंब देवदर्शन; भक्तांसाठीही सहकार्याचा हात

वाघोली बुटी येथील प्रेमीला रोहनकर या आज, शनिवारी सकाळी शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान, दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहीती मिळताच वनविभाग व पोलीस विभाग घटनास्थळी गेले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.