बुलढाणा : मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील राहिवासी असलेल्या ५० वर्षीय महिलेची जिल्ह्यातील सैलानी परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लता मुरलीधर कोतकर (५०, रा. सुलतानपूर, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद) असे मृत महिलेचे नाव आहे. तिचा मुलगा विकास कोतकर याने दिलेल्या तक्रारीवरून रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा >>> “…अन्यथा मुंबईत येऊन अधिकाऱ्यांचे तोंड रंगवू”, आमदार बच्चू कडूंचा इशारा
लता कोतकर यांना पायाचा त्रास असल्याने त्या सैलानी येथील दर्ग्यावर दर्शनासाठी येत होत्या. अनेक दिवस त्या येथे मुक्कामी रहायच्या. दरम्यान सैलानीनजीकच्या भडगाव जंगलात तिचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळून आला. पंचनामा झाल्यावर रायपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार राजवंत आठवले करीत आहे.