लोकसत्‍ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमरावती: सध्याच्या इंटरनेट युगात जवळपास प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन असल्यामुळे ऑनलाइन व्यवहार ग्राहकांकडून होऊ लागले आहेत. त्‍यातच ग्राहकांची फसवणूक होण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. एका ऑनलाईन वस्‍तू विक्री करणाऱ्या कंपनीकडून १२ लाख ६० हजार रुपयांचे प्रथम बक्षीस मिळाल्याचे आमिष दाखवून करून एका महिलेची ३१ हजार ६४१ रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. याप्रकरणी, फ्रेजरपुरा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारकर्त्‍या महिलेच्या मोबाईलवर ३० सप्टेंबर २०२२ रोजी अज्ञात आरोपीने संपर्क साधला आणि तुम्हाला कंपनीकडून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाल्याची माहिती दिली. त्या आरोपीने महिलेला कंपनीची लिंक व इतर मा‍हिती व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवली. तिचा विश्वास संपादन करून रजिस्ट्री फी म्हणून ३५०० रुपये भरण्याची सूचना केली. त्यानंतरच तुमच्या खात्यावर १२ लाख ६० हजारांचा चेक जमा होईल. टीडीएस भरल्याशिवाय चेक खात्‍यामध्‍ये जमा होणार नाही, असे आरोपीने महिलेला सांगितले. मोबाईल क्रमांक धारकाने स्वतःचे नाव पंकज सिंग भारतीय असे सांगितले.

हेही वाचा… ‘MPSC’ने तयार केले नवे मोबाइल ॲप; गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध

आरोपीने सुरूवातीला १०,१५६ रूपये फोन पे द्वारे भरण्यास सांगितले. ती रक्कम महिलेने पाठविली. त्यानंतर पुन्हा त्याच आरोपींनी आरबीआयकडून चेक व्हेरिफाय करून द्यावा, त्यासाठी चेक व्हेरिफिकेशन चार्ज भरावे लागतील, अशी माहिती दिली. त्यामुळे त्या महिलेने एसबीआय ग्राहक सेवा केंद्रातून १७ हजार ९८५ रूपये आरोपीच्या खात्यात ऑनलाईन भरले, मात्र त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तिने सायबर पोलीस ठाणे गाठले.