बुलढाणा: मलकापूर मार्गावरील राजूर घाटातील सामूहिक बलात्काराच्या दुर्दैवी घटनेतील आठ आरोपींची ओळख पटली असून त्यांच्या शोधासाठी तीन पथके गठित रवाना करण्यात आली आहे.
राजूर घाटातील देवी मंदिर परिसरात एका इसमासोबत आलेल्या महिलेवर ८ नराधमांनी सामूहिक अत्याचार केला. याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी वरील माहिती दिली. पीडितेची प्रकृती स्थिर असल्याचे ते म्हणाले. महिलेसोबतच्या पुरुष फिर्यादीने घटनेत ८ आरोपीचा समावेश असल्याची पुष्टी दिली. सर्व आरोपींची ओळख पटली असून त्यांचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली आहेत.
हेही वाचा… अजित पवारांना अर्थ खाते मिळताच जिल्ह्यातील शरद पवार समर्थकांचा ‘यू टर्न’; चार जणांची ‘घरवापसी’
दरम्यान, पीडित महिलेचा जबाब महिला अधिकारी घेणार असल्याचे कडासने म्हणाले. ही घटना दुर्दैवी व गंभीर स्वरूपाची असल्याचे सांगून तांत्रिक व कायद्यांची सांगड घालून तपास करण्यात येईल. आरोपींना कठोर शिक्षा होईल या दृष्टीने तपास करण्यात येणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.