अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील गोठणगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या वडेगाव/बंध्या येथे वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना आज, गुरुवारी दुपारी घडली. आशा संजय ताळाम (३५), असे असे मृत महिलेचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- नागपूर : नायलॉन मांजा विक्री विरोधात पोलिसांचे छापेसत्र, बड्या विक्रेत्यांवर नजर

आशा ताळाम इतर सहा-सात महिलांसोबत सरपण आणण्यासाठी वडेगाव/बंध्या ते वाळव्ही रस्त्यावरील जंगलात गेल्या होत्या. सरपण गोळा करीत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत वनविभागाला कळवले. वनविभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. मृत महिलेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून २५ हजार रुपये देण्यात आले. शासन निर्णयाप्रमाणे २० लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती नवेगावबांधचे सहायक वनसंरक्षक दादा राऊत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.