नागपूर: नोकरी करण्यासाठी नागपुरात आलेल्या मध्यप्रदेशातील एका महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध टाकून दोघांनी रात्रभर सामूहिक बलात्कार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सकाळी शुद्धीवर आल्यानंतर बलात्कार झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून दोघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. रत्नदीप ऊर्फ पिंटू गजभिये (३९), रा. रमना मारोती आणि कार्तिक चौधरी (५०), रा. बिनाकी लेआऊट अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा… नागपूर: बहिणीच्या प्रियकराचा चाकूने भोसकून खून

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मध्यप्रदेशच्या सिहोरमध्ये राहणारी ३२ वर्षीय महिला घटस्फोटित आहे. तिला दोन मुले आहे. तीन वर्षांपूर्वी फेसबुकवर पिंटूशी तिची मैत्री झाली. तेव्हापासून दोघांमध्ये चॅटिंग सुरू होती. महिला नोकरीच्या शोधात होती. पिंटूने तिला नागपुरात नोकरी मिळाल्याचे सांगितले.

हेही वाचा… लाचखोरीत महसूल आणि पोलीस विभाग अव्वल! नाशिक पहिल्या तर पुणे द्वितीय स्थानावर

२१ जूनला महिला बसने मध्यप्रदेश बसस्थानकावर आली. पिंटू आणि कार्तिकने तिला नोकरीसाठी कार्यालयात नेण्याचा बहाणा केला. रस्त्यात शीतपेयामध्ये गुंगीचे औषध मिळवून तिला पाजले. त्यानंतर महिलेला उमरेड मार्गावर डोंगरगाव परिसरातील एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेले. बेशुद्धावस्थेत दोघांनीही तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी महिला शुद्धीवर आली. तिने जाब विचारला असता पिंटूने तिला ठार मारण्याची धमकी दिली. तिला दिघोरीमध्ये एका मैत्रिणीच्या घरी सोडून ते दोघे पसार झाले. महिलेने सीताबर्डी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A woman who came to nagpur for a job was gang raped adk 83 dvr