वर्धा : आता सैन्यदलात महिलेने उत्तुंग यश गाठले आहे. सैन्यात बॉम्बे इंजिनिअर्स ग्रुप आहे. अभियांत्यांची ही रेजिमेंट बॉम्बे सॅपर्स म्हणून ओळखल्या जाते. त्याचे नेतृत्व बी टेक झालेल्या मेजर दिव्या त्यागी करतात. बॉम्बे सॅपर्सच्या तीन शतकांच्या इतिहासात प्रथमच एका महिला अधिकारीने दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये रेजिमेंटच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व केले.

मेजर दिव्या त्यागी यांना आठ वर्षांपूर्वी कॉर्प्स ऑफ इंजिनिअर्सच्या ११५ अभियंता रेजिमेंटमध्ये नियुक्त करण्यात आले होते. ही एक अविस्मरणीय कामगिरी समजल्या जाते. या तुकडीत एक अधिकारी, दोन कनिष्ठ आयोग अधिकारी आणि १४४ इतर रँक आहेत, जे गेल्या सहा महिन्यांपासून परेडसाठी अथक सराव करत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये बॉम्बे सॅपर्सच्या सर्व पुरुष तुकडीचे नेतृत्व करणाऱ्या मेजर त्यागी या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Shakuntala Bhagat, First woman civil engineer,
शकुंतला भगत… भारतात ६९ पूल बांधणाऱ्या पहिल्या महिला सिव्हिल इंजिनिअर
Bhagyashree Atram daughter of Minister Dharma Rao Baba Atram join sharad pawar NCP
गडचिरोली : राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच मुलगी विरुद्ध वडील राजकीय संघर्ष; आत्राम कुटुंबातील फुटीमुळे…
renukaswamy offere to pavithra gowda live in relationship
Renukaswamy Case Chargesheet: ‘लिव्ह इनमध्ये ये, महिन्याला १० हजार देतो’, चाहत्याची अभिनेत्रीला ऑफर; हत्या होण्यापूर्वी पाठवले गुप्तांगाचे फोटो
russia missile strike on ukraine
Russia Attack On Ukraine : रशियाचा युक्रेनवर पुन्हा क्षेपणास्र हल्ला, पोल्टावामधील लष्करी शिक्षण संस्थेला केलं लक्ष्य; ५० जणांचा मृत्यू, २७१ जखमी
Telegram ceo arrested in france
टेलीग्रामच्या संस्थापकाला फ्रान्समध्ये अटक; कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध?
raped on dog up
Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

हेही वाचा – गडचिरोली : नक्षल्यांशी मुकाबला करणाऱ्या १९ जवानांना पोलीस ‘शौर्य’ पदक, सोमय मुंडेंना राष्ट्रपती पदक

हेही वाचा – लग्न जुळवताना हुंडा मागता का? मराठा सर्वेक्षणासंबंधी प्रश्नावलीत वादग्रस्त प्रश्न

स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये बीटेक झालेले आणि लष्करी अधिकाऱ्याशी विवाह केलेल्या मेजर त्यागी सध्या पुणे जिल्ह्यातील खडकी येथील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप अँड सेंटर येथे तैनात आहेत. त्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, चेन्नईमधून अकादमी कॅडेट अ‍ॅडज्युटंट म्हणून उत्तीर्ण झाल्या आणि सप्टेंबर २०१६ मध्ये बॉम्बे सॅपर बनल्या. बॉम्बे सॅपर्सने त्यांचे मूळ ब्रिटीश राजवटीच्या पूर्वीच्या बॉम्बे प्रेसिडेन्सी सैन्यातून घेतले आहे. गटाचे खडकी येथे केंद्र आहे. जरी सॅपर्स १७७७ मध्ये त्यांचे मूळ शोधत असले तरी, जेव्हा पायनियर लष्कर बॉम्बे प्रेसिडेन्सी अंतर्गत वाढले होते, तेव्हा ग्रुपच्या स्थापनेचे साल १८२० मानले जाते. तेव्हा इंजिनिअर रेजिमेंटची स्थापना झाली आणि ‘सॅपर्स आणि मायनर्स’ म्हणून नियुक्त कंपनी बनवली गेली. वर्धेकरांसाठी सुखद धक्का म्हणजे दिव्या ह्या या गावच्या सूनबाई आहेत. त्यांचे मेजर पती पण बीटेक असून याच दलात सेवा देतात. येथील जिल्हा परिषदेतून अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेले संजय उगेमुगे यांच्या दिव्या या सूनबाई होत.