लोकसत्ता टीम

भंडारा: ‘‘तुम्ही तुमचा व्हॉट्सॲप डीपी बदला, आपल्या दोघांचा फोटो काढून तुमचा एकट्याचा फोटो ठेवा”, असे ‘ति’ने सायंकाळी फोन करून नवऱ्याला सांगितले. त्यांच्यातील हे संभाषण शेवटचे ठरले. फोन ठेवल्यानंतर ‘ति’ने भंडारा रोड रेल्वेस्थानक गाठले. ‘ती’ रेल्वे रुळावरून चालत असतानाच समोरून मालगाडी धडधडत आली अन् धावत्या मालगाडीसमोर बसून ‘ति’ने आपले जीवन संपविले. ही घटना काल १२ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. मृत विवाहितेचे नाव कलावती मलेवार (४०, रा. मोहगाव देवी) असे असून ती योग शिक्षका आणि एलआयसी एजंट होती.

Who is Abhinav Arora
Abhinav Arora: दहा वर्षांच्या आध्यात्मिक गुरूला बिश्नोई टोळीकडून धमकी, कुटुंबाचा दावा; व्हायरल व्हिडीओंमुळे आला होता चर्चेत
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
om puri and shabana azmi
“लोक जेवायला बोलवायचे तेव्हा आम्ही…”, शबाना आझमींनी सांगितला ओम पुरी यांच्याबरोबरचा किस्सा; म्हणाल्या…
ankita walawalkar aka kokan hearted girl replied to netizen
“गावी कोणीही या मुलीचं Welcome केलं नाही” नकारात्मक कमेंट करणाऱ्या युजरला अंकिताने सुनावलं; म्हणाली, “मी मुद्दाम…’
Abhijeet Sawant
सूरज चव्हाणच्या ‘झापुक झुपूक’ गाण्यावर अभिजीत सावंतने काढले भन्नाट सेल्फी! नेटकरी म्हणाले, “बाईSSS…”
dhananjay powar family welcome irina at kolhapur
Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण
What Sanjay Raut Said?
Sanjay Raut : भाजपाबरोबर जाण्याच्या चर्चांवर संजय राऊत म्हणतात, “आम्ही त्यांच्याशी हातमिळवणी…”
bacchu kadu on bjp pravin tayde
भाजपाच्या उमेदवार यादीवरून बच्चू कडूंचं टीकास्र; म्हणाले, “केंद्रात सत्ता असतानाही माझ्याविरोधात…”

मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी येथील कलावती हिला दोन अपत्य आहेत. मुलगी डीफॉर्म करत असून मुलगा इयत्ता ९ वित शिकत आहे. कलावतीचे यजमान राईस मिलमध्ये नोकरीला असून त्याचा संसार दृष्ट लागण्यसारखा सुरू होता. कलावतीचे माहेरही गावातच असून आई आणि भावांसोबात तिची फार जवळीक होती. कलावती अत्यंत हुशार, मेहनती आणि देखणी होती. एलआयसीमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल नुकताच तिला पुरस्कार मिळाला होता. सुस्वभावामुळे तिचे अनेकांशी चांगले संबंध होते.

हेही वाचा… बुलढाणा : टाळ मृदुंगाच्या गजरात वारकऱ्यांवरील लाठीहल्ल्याचा निषेध; वारकरी सेनेचे प्रतिकात्मक आंदोलन

काही दिवसांपूर्वीच तिने वरठी येथे तिचे स्वतः चे योग शिकवणी वर्ग सुरू केले होते. नियमितपणे ती मोहगाववरून वरठीला योगा शिकविण्याकरिता यायची. मात्र मागील दीड महिन्यापासून ती काहीशी तुटक वागत असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले. काल सायंकाळी कलावतीने नवऱ्याला फोन करून व्हॉट्सॲप डीपी बदलवून तुमचा एकट्याचा ठेवा असे सांगितले. मात्र नवऱ्याला तिच्या बोलण्याचा अर्थ कळला नाही. त्याने मुलाला आई असे का बोलली असेल असेही विचारले. मात्र कलावतीच्या मनात काय चालले होते कुणालाही कळले नाही.

हेही वाचा… बुलढाणा : खामगावच्या वरुडमध्ये दोन गटांत सशस्त्र हाणामारी; १९ जखमी

सायंकाळी तिने तिच्या दुचाकीने भंडारा रोड (वरठी) रेल्वे स्थानक गाठले. स्थानकापासून एक किलो अंतरावर तिने तिची दुचाकी ठेवली आणि दुचाकीची चाबी स्वतःच्या बुटात ठेवली. त्यानंतर ती एक किमी चालत रेल्वे रुळावर आली. ती रुळावरून चालू लागली. तिच्या हालचाली संशयास्पद असल्याचे पुलावरून जाणाऱ्या एका तरुणाला दिसले. त्याचवेळी खातकडून कोक्याच्या दिशेने एक मालगाडी येत असल्याचे पाहून कलावती रुळावर बसली. धावत्या मालगाडी खाली स्वतःला झोकून देत तिने आत्महत्या केली. या अपघातात तिचा चेहरा पूर्णपणे छिन्नविछिन्न झाला होता आणि तिचा उजवा हात कोपरापासून वेगळा झाला होता. रुळावर तिचे मंगळसूत्र पडलेले दिसल्याने ती विवाहित असल्याची खात्री पटली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा… ‘ओबीसी’वरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये कलगीतुरा

कलावती योग शिबिराच्या माध्यमातून लोकांना तणावमुक्त जगण्यासाठी धडे देत असे. मग तिनेच असे टोकाचे पाऊल का उचलले, असा प्रश्न तिच्या कुटुंबीयांनाही पडला आहे.